How Many Chapatis Should You Eat Daily? : उत्तम आरोग्यासाठी दिवसाला किती चपात्या खाव्यात?

बाळकृष्ण मधाळे

दिवसाला किती चपात्या खाल्ल्या तर आरोग्य उत्तम राहते?

आपण नेहमी ऐकतो, की चपात्या खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. भाजी आणि डाळीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या चपात्या आपल्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

चपातीमध्ये कोणते घटक असतात?

गव्हाच्या चपात्या या पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. त्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि व्हिटॅमिन बी यांचा समावेश असतो. त्यामुळे त्या शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

चपातीमध्ये कॅलरीज किती असतात?

एका गव्हाच्या चपातीमध्ये साधारणपणे ८० ते ८५ कॅलरीज आणि १५ ते १८ ग्रॅम कर्बोदके असतात. त्यामुळे जर तुम्ही कॅलरी नियंत्रणात ठेवण्याचा विचार करत असाल, तर चपात्या हा एक संतुलित आणि चांगला पर्याय आहे.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

रक्तातील साखरेवर नियंत्रण

अनेकांना वाटते की चपात्या जास्त खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते; पण प्रत्यक्षात, चपात्यांमध्ये असलेले फायबर आणि प्रथिने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मात्र, प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

दिवसाला किती चपात्या खाव्यात?

एखाद्या व्यक्तीने किती चपात्या खाव्यात, हे त्याच्या वजन, शारीरिक हालचाली आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

एका वेळी किती चपात्या खाव्यात?

एका वेळच्या जेवणात २ ते ४ चपात्या खाणे योग्य मानले जाते. यानुसार, दिवसाला जास्तीत जास्त ६ ते ८ चपात्या खाल्ल्या जाऊ शकतात.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

५५ ते ६५ किलो वजन असलेल्यांसाठी :

हलका व्यायाम किंवा कमी शारीरिक काम करणाऱ्या व्यक्तींनी दिवसाला ३ ते ४ चपात्या खाव्यात.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

६५ ते ७५ किलो वजन असलेल्यांसाठी :

मध्यम प्रमाणात सक्रिय असलेल्या व्यक्तींनी दिवसाला ४ ते ५ चपात्या खाणे योग्य ठरते.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

जास्त चपात्या खाल्ल्याचे दुष्परिणाम

चपात्यांचे अतिसेवन केल्यास काही समस्या उद्भवू शकतात :

  • वजन वाढणे

  • रक्तातील साखर वाढणे

  • पोट फुगणे (ब्लोटिंग)

म्हणूनच, संतुलित आहार घेणे आणि प्रमाणात चपात्या खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

टीप :

ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित विशेष सल्ल्यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

What Are the Health Benefits of Chapati?

|

esakal

Roasted Garlic Benefits : फक्त 1 महिना भाजलेला लसूण खा आणि जादू पाहा! 'या' गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका

what happens if you eat roasted garlic daily

|

esakal

येथे क्लिक करा...