संतोष कानडे
अकबराच्या शाही स्वयंपाकघरात विविध देशांतून आलेले स्वयंपाकी काम करत होते.
धान्य, भाज्या, मांस, गोड पदार्थ आणि विविध मसाल्यांचे अनेक प्रकार तयार केले जात.
अबुल फजलच्या नोंदीनुसार, बादशहाच्या आदेशानंतर एका तासात सुमारे १०० पदार्थ तयार करून वाढले जाऊ शकत होते.
शाही स्वयंपाकघराची क्षमता मोठी होती. मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांसह विविध प्रकारचे भात, पुलाव आणि मांसाचे पदार्थ बनवले जात.
कबाब, यखनी, पुलाव आणि विविध प्रकारचे मांसाहारी पदार्थ शाही स्वयंपाकातील महत्त्वाचे प्रकार होते.
शाही स्वयंपाकघराची देखरेख मीर बकावल या अधिकाऱ्याकडे होती. बादशहाला अन्न देण्यापूर्वी पदार्थांची तपासणी केली जात असे.
काही परदेशी प्रवाशांच्या नोंदींमध्ये अकबराच्या मेजवानीत ४० पदार्थ असल्याचा उल्लेख आढळतो.
त्यामुळे मुघलांचे शाही स्वयंपाकघर हे मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करणारी अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्था होती.
Ayurvedic Eating Routine
esakal