सकाळ वृत्तसेवा
दारू (Wine) द्राक्षांपासून बनवली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, एका 750 ml च्या बाटलीसाठी किती द्राक्षं लागतात?
दारू बनवण्यासाठी पूर्णपणे पिकलेली द्राक्षं वापरली जातात. पिकलेली द्राक्षं चवीला गोडसर किंवा किंचित आंबट असतात.
दारूची चव द्राक्षांच्या गोडवा आणि आम्लतेवर ठरते. जितकी द्राक्षं रसाळ आणि पिकलेली, तितकी दारू चवदार.
750 ml च्या एका बाटलीसाठी सरासरी 600 ते 800 द्राक्षं लागतात. जर द्राक्षं मोठी व रसाळ असतील तर कमी द्राक्षं लागतात.
सर्वप्रथम द्राक्षांचा रस काढला जातो.
रसातून द्राक्षांची साले आणि बिया वेगळ्या केल्या जातात. फक्त शुद्ध रस fermentation साठी वापरतात.
रसात यीस्ट मिसळलं जातं आणि काही काळ ठेवून fermentation केलं जातं.
दारूचा रस ओकच्या पिंपात महिन्यांपासून वर्षांपर्यंत साठवला जातो. यामुळे दारूला वेगळा स्वाद आणि सुगंध येतो.
साठवणीनंतर दारू फिल्टर करून बाटल्यांमध्ये भरली जाते आणि मग ती बाजारात येते.