निसर्गाचा चमत्कार! ऑक्टोपसला एक-दोन नव्हे तर असतात 'इतकी' हृदये

सकाळ डिजिटल टीम

शारीरिक रचना 

ऑक्टोपसला किती हृदय आहेत आणि त्याची शारीरिक रचना कशी आहे जाणून घ्या.

Octopus

|

sakal 

तीन हृदये

ऑक्टोपसच्या शरीरात एकूण ३ (तीन) हृदये असतात. निसर्गात अशा प्रकारची शरीररचना खूप कमी प्राण्यांमध्ये पाहायला मिळते.

Octopus

|

sakal 

कार्यांची विभागणी

या तीन हृदयांपैकी दोन हृदये रक्ताला कल्ल्यांकडे (Gills) ढकलण्याचे काम करतात, तर एक हृदय संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करते.

Octopus

|

sakal 

सिस्टेमिक हार्ट

शरीराच्या मध्यभागी असलेले हे मुख्य हृदय आहे. ते प्राणवायूयुक्त (Oxygenated) रक्त ऑक्टोपसच्या सर्व अवयवांना आणि स्नायूंना पोहोचवते.

Octopus

|

sakal 

ब्रँकियल हृदये

कल्ल्यांच्या तळाशी दोन छोटी हृदये असतात. ही हृदये कार्बन डायऑक्साइडयुक्त रक्त कल्ल्यांकडे पंप करतात, जेणेकरून तिथे रक्ताचे शुद्धीकरण होऊन त्यात ऑक्सिजन मिसळला जाईल.

Octopus

|

sakal 

पोहताना हृदय थांबते

जेव्हा ऑक्टोपस वेगाने पोहतो, तेव्हा त्याचे मुख्य (Systemic) हृदय धडधडणे थांबवते. यामुळे तो लवकर थकतो, म्हणूनच तो पोहण्यापेक्षा समुद्रतळावर सरपटणे जास्त पसंत करतो.

Octopus

|

sakal 

निळे रक्त

मानवी रक्तामध्ये लोह (Iron) असल्याने ते लाल असते, मात्र ऑक्टोपसच्या रक्तात तांबे (Copper) असलेले 'हिमोसायनिन' (Hemocyanin) नावाचे प्रथिन असते. त्यामुळे त्यांचे रक्त निळ्या रंगाचे दिसते.

Octopus

|

sakal 

मेंदू आणि ३ हृदये

केवळ ३ हृदयेच नव्हे, तर ऑक्टोपसला ९ मेंदू असतात. एक मुख्य मेंदू आणि प्रत्येक ८ हातांमध्ये प्रत्येकी एक स्वतंत्र मेंदू असतो.

Octopus

|

sakal 

अद्वितिय उत्क्रांती:

ऑक्टोपसची ही तीन हृदयांची यंत्रणा त्याला समुद्राच्या टोकाच्या परिस्थितीतही शिकार करण्यास आणि स्वतःचा बचाव करण्यास सक्षम बनवते.

Octopus

|

sakal

Dead Venomous Snake Danger : सावधान! मेलेला साप जिवंत सापापेक्षाही असू शकतो जास्त घातक; चुकूनही करू नका 'ही' चूक!

How Long Snake Venom Remains Active After Death

|

esakal

येथे क्लिक करा