सकाळ डिजिटल टीम
जीरा पाणी हे एक आयुर्वेदिक पेय आहे. जे पचनक्रिया सुधारते, चयापचय वाढवते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करते.
मात्र, हे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे, जेणेकरुन त्याच्या अति सेवनाने कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत.
जिऱ्याचे पाणी दिवसातून 1 ते 2 वेळा प्यावे.
हे पाणी चयापचय वाढवते आणि पाचन तंत्र सक्रिय करण्यास मदत करते. तसेच पचन सुधारुन झोप सुधारण्यासही मदत करते.
जिऱ्याचे पाणी जास्त प्यायल्याने आम्लपित्त किंवा पोटात गॅस होऊ शकतो. यामुळे साखरेची पातळीही कमी होऊ शकते.
जिऱ्याच्या पाण्यामुळे कमी रक्तदाब असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो.
1 ते 2 चमचे जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते उकळून गाळून प्यावे.