दिवसातून किती वेळा लघवीला जावे?

Aarti Badade

नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया

लघवी करणे ही शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत होणारे बदल तुमच्या आरोग्याविषयी बरेच काही सांगून जातात.

Normal urination frequency per day

|

Sakal

नक्की किती वेळा असावे प्रमाण?

तज्ज्ञांच्या मते, एक निरोगी व्यक्ती दिवसातून ६ ते ८ वेळा लघवी करत असेल, तर ते सामान्य मानले जाते. यापेक्षा खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाण असणे हे आरोग्याच्या समस्येचे संकेत असू शकतात.

Normal urination frequency per day

|

sakal

पाणी आणि आहार यांचा परिणाम

तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण लघवीच्या फ्रीक्वेंसीवर थेट परिणाम करते. जास्त पाणी किंवा द्रव पदार्थांचे (जसे की ज्यूस, सूप) सेवन केल्यास लघवीचे प्रमाण वाढते, तर कमी पाणी प्यायल्यास ते घटते.

Normal urination frequency per day

|

Sakal

युटीआय आणि जळजळ

मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच युटीआय (UTI) झाल्यास वारंवार लघवीला लागते. अशा वेळी लघवी करताना जळजळ किंवा वेदना जाणवू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

Normal urination frequency per day

|

Sakal

मधुमेहाचे लक्षण

जर तुम्हाला अचानक वारंवार लघवीला येत असेल, तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. रक्तातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी शरीर वारंवार लघवी तयार करते.

Normal urination frequency per day

|

Sakal

किडनी आणि प्रोस्टेट

लघवीच्या प्रमाणात होणारे बदल हे केवळ पाण्याचा परिणाम नसून किडनी, हृदय किंवा प्रोस्टेटच्या समस्यांचे संकेतही असू शकतात. वयानुसार प्रोस्टेट वाढल्यामुळेही लघवीची वारंवारता वाढते.

Normal urination frequency per day

|

Sakal

जीवनशैलीकडे लक्ष द्या

तुमची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी लघवीच्या प्रमाणावर परिणाम करतात. जर तुम्हाला लघवीच्या संदर्भात सतत काही वेगळे बदल जाणवत असतील, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Normal urination frequency per day

|

Sakal

चेहरा टॅन झालाय? घरी बनवलेला 'हा' फेसपॅक देईल इंस्टंट ग्लो!

Turmeric face pack for glowing skin

|

Sakal

येथे क्लिक कर