चेहरा टॅन झालाय? घरी बनवलेला 'हा' फेसपॅक देईल इंस्टंट ग्लो!

Aarti Badade

उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या

उन्हाळ्यात उष्णता आणि घामामुळे त्वचा निस्तेज आणि काळपट दिसू लागते. चेहऱ्यावरची नैसर्गिक चमक कमी झाल्यामुळे तुम्ही थकलेले दिसता.

Turmeric face pack for glowing skin

|

sakal

हळदीचे जादुई गुणधर्म

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात. हे घटक केवळ पिंपल्स कमी करत नाहीत, तर त्वचेचे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन रोखण्यासही मदत करतात.

Turmeric face pack for glowing skin

|

Sakal

कोरफडीचा (Aloe Vera) थंडावा

कोरफड त्वचेला थंडावा देऊन उन्हामुळे होणारी जळजळ कमी करते. तसेच त्वचेला हायड्रेट ठेवून नैसर्गिक चमक वाढवण्याचे काम करते.

Turmeric face pack for glowing skin

|

Sakal

फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत

एका बाऊलमध्ये थोडे बेसन घ्या. त्यात २ चमचे कोरफड जेल आणि चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण स्मूथ पेस्ट होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्या.

Turmeric face pack for glowing skin

|

Sakal

लावण्याची योग्य पद्धत

तयार झालेला फेसपॅक चेहरा आणि मानेला व्यवस्थित लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Turmeric face pack for glowing skin

|

Sakal

टॅनिंग आणि डागांपासून सुटका

हा फेसपॅक नियमित लावल्यास पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स (काळे डाग) कमी होतात. सूर्यप्रकाशामुळे झालेली टॅनिंग घालवण्यासाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

Turmeric face pack for glowing skin

|

Sakal

नैसर्गिक गुलाबी चमक

या फेसपॅकच्या वापरामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी ग्लो येतो आणि तुम्ही दिवसभर फ्रेश दिसता. पार्लरच्या खर्चाची आता गरज नाही!

Turmeric face pack for glowing skin

|

Sakal

उठल्या उठल्या करता 'या' चुका? हृदयासाठी ठरू शकतात घातक

Bad morning habits for heart

|

Sakal

येथे क्लिक करा