दिवसातून किती वेळा केस विंचरावेत?

Aarti Badade

केस

केस निरोगी आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. केसांची लांबी आणि गरज लक्षात घेऊन दिवसातून एक किंवा दोन वेळा हलक्या हाताने केस विंचरू शकता.

best hair comb | sakal

केस विंचरण्याचे फायदे

केस विंचरल्याने त्यातील गुंता सुटतो आणि केस नीटनेटके दिसतात. मात्र, जोरात कंगवा फिरवल्यास केस तुटण्याची शक्यता असते.

good hair comb | esakal

सकाळी आणि रात्री केस विंचरा

सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी केस हलक्या हाताने विंचरणे फायदेशीर ठरू शकते. केस ओढले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

Hair comb | Esakal

लांब केसांची घ्या विशेष काळजी

लांब केसांमध्ये गुंता होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे केसांच्या टोकांपासून हळूहळू कंगवा फिरवत गुंता सोडवा.

Hair comb | Esakal

केस न विंचरल्यास काय होते?

केस नियमित न विंचरल्यास त्यात गुंता होऊ शकतो. त्यामुळे केस सांभाळणे कठीण जाते आणि गुंता सोडवताना केस तुटू शकतात.

Hair comb

| esakal

केसांचा नैसर्गिक चमकदारपणा टिकवा

केस विंचरल्याने टाळूवरील नैसर्गिक तेल केसांमध्ये पसरायला मदत होते. त्यामुळे केसांना चमक येऊ शकते; मात्र कंगवा केल्याने टाळू पूर्णपणे स्वच्छ होत नाही.

Hair comb | Esakal

केस विंचरताना या गोष्टी लक्षात ठेवा

केसांची वाढ होण्यासाठी किंवा केसगळती थांबवण्यासाठी वारंवार कंगवा करणे आवश्यक नाही. स्वच्छ कंगवा वापरा आणि केस ओढले जाणार नाहीत अशा पद्धतीने विंचरा.

Hair comb | Esakal

मसाला दूध की हळदीचे दूध, काय जास्त फायदेशीर?

masala-milk vs turmeric-milk

|

Sakal

येथे क्लिक करा