दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा?

Aarti Badade

चेहरा धुवावा

त्वचेची स्वच्छता राखण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुणे सामान्यतः पुरेसे असते; मात्र त्वचेचा प्रकार आणि गरजेनुसार यात बदल होऊ शकतो.

face washing frequency

|

Sakal

सकाळी उठल्यावर चेहरा धुवा

सकाळी चेहरा स्वच्छ केल्याने त्वचेवरील तेल आणि घाम दूर होण्यास मदत होते, तसेच पुढील स्किन केअर उत्पादने लावणे सोपे जाते.

face washing frequency

|

Sakal

रात्री चेहरा स्वच्छ करायला विसरू नका

दिवसभर चेहऱ्यावर साचलेली धूळ, तेल आणि मेकअप काढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे.

face washing frequency

|

Sakal

त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश निवडा

तेलकट, कोरडी किंवा संवेदनशील त्वचा लक्षात घेऊन सौम्य फेसवॉश निवडा, जेणेकरून त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

face washing frequency

|

Sakal

चेहरा धुण्याची योग्य पद्धत

प्रथम चेहरा कोमट किंवा साध्या पाण्याने ओला करा, त्यानंतर फेसवॉश हलक्या हाताने साधारण २० ते ३० सेकंद लावून स्वच्छ धुवा.

face washing frequency

|

Sakal

फेसवॉश वापरताना ही काळजी घ्या

खरखरीत कण असलेले किंवा त्वचेला जळजळ करणारे उत्पादन टाळा आणि चेहरा जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने स्वच्छ करा.

face washing frequency

|

Sakal

चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा

चेहरा धुतल्यानंतर मऊ टॉवेलने हलकेच पुसून त्वचेला अनुरूप मॉइश्चरायझर लावा, तसेच घाम किंवा अतिरिक्त तेलामुळे गरज भासल्यास चेहरा पुन्हा स्वच्छ करा.

face washing frequency

|

Sakal

इंदुरी किल्ला किती वर्ष जुना आहे?

induri fort history

|

Sakal

येथे क्लिक करा