उन्हाळ्यात नेमका किती वेळा चेहरा धुवावा? डर्माटोलॉजिस्ट काय सांगतात

Payal Naik

प्रचंड घाम

मार्च, एप्रिल, मे हे महिने या महिन्यांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड असते. त्यात आता उन्हाचा तडाखा वाढलाय. त्यामुळे प्रचंड घाम येतो.

how many times you should wash your face in summer

|

esakal

शंका

उन्हाळ्यात दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात. जितका जास्त आपण चेहरा धुवू तितका जास्त तो चांगला राहील असं अनेकांना वाटतं.

how many times you should wash your face in summer

|

esakal

सल्ला

मात्र असं नसतं. डर्माटोलॉजिस्ट उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी काय सल्ला देतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

how many times you should wash your face in summer

|

esakal

गृहिणी

जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही सकाळी, सायंकाळच्या सुमारास आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणं गरजेचं आहे.

how many times you should wash your face in summer

|

esakal

वर्किंग वूमन

जाणीव जर तुम्ही वर्किंग वूमन असाल तर सकाळी, उन्हातून कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर, घरी परत आल्यानंतर आणि रात्री असा चेहरा धुणं गरजेचं आहे.

how many times you should wash your face in summer

|

esakal

नुसतं पाणी

किमान २ वेळा तरी चेहरा नुसता पाण्याने न धुता फेसवॉशने धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ माती निघून जाते. इतर वेळेस चेहऱ्यावर नुसतं पाणी मारलं तरी चालतं.

how many times you should wash your face in summer

|

esakal

मॉइश्चरायझर

तुमचा चेहरा जर धुतल्यानंतर ओढल्यासारखा वाटत असेल तर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. शिवाय गरम पाण्याने चेहरा धुणं टाळा.

how many times you should wash your face in summer

|

esakal

तेलकट त्वचा

तेलकट त्वचा असणाऱ्यांनीही किमान २ वेळा फेसवॉशने चेहरा धुवून त्यावर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे.

how many times you should wash your face in summer

|

esakal

सनस्क्रीन

तर उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणं अत्यंत महत्वाचं आहे.

how many times you should wash your face in summer

|

esakal

हातानी किंवा नखांनी स्पर्श करणे टाळा

शिवाय चेहऱ्याच्या त्वचेला सतत हातानी किंवा नखांनी स्पर्श करणे टाळा. यामुळे संसर्ग होऊन पुरळ येण्याचा धोका असतो. (या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. )

how many times you should wash your face in summer

|

esakal

तेजश्री प्रधान कुठे राहते माहितीये का? बालपणी ठरवलेल्या जागीच घेतलंय घर

tejashree pradhan

|

ESAKAL

येथे क्लिक करा