Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
ती कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या सोबत जोडलेली राहते.
तिने 'प्रेमाची गोष्ट', अग्गबाई सासूबाई' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.
मात्र ती 'होणार सून मी या घरची' मधून घराघरात पोहोचली.
तिने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर चाहत्यांचा हिरमोड झाला होता.
तेजश्री मूळची डोंबिवलीची आहे. तिचं शिक्षणही तिथेच झालं.
मात्र तेजश्री सध्या कुठे राहते तुम्हाला ठाऊक आहे का?
राजश्री मराठीने दिलेल्या माहितीनुसार, तेजश्रीने पाच वर्षांपूर्वी गोरेगाव येथे घर घेतलं होतं.
तिने लहानपणी ठरवलेल्या ठिकाणीच घर घेतलं आहे.