Anushka Tapshalkar
वाहन चालवताना ट्रॅफिक नियम मोडल्यास फक्त दंडच नाही, तर आता ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होऊ शकतं.
Driving License Cancellation Rule
sakal
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 या एका वर्षात 5 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रॅफिक चलन झाल्यास संबंधित चालकावर लायसन्स रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
Driving License Cancellation Rule
sakal
लायसन्स रद्द करण्याचा अंतिम निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) घेईल. चालकाला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली जाईल.
Driving License Cancellation Rule
sakal
ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी जोडल्यामुळे देशात कुठेही ट्रॅफिक नियम मोडल्यास त्याची नोंद थेट तुमच्या प्रोफाइलमध्ये होईल.
Driving License Cancellation Rule
sakal
एआय-आधारित कॅमेरे आणि ई-चालान प्रणालीमुळे पोलिस नसतानाही नियमभंग झाल्यास आपोआप चालान तयार होऊ शकतं.
Driving License Cancellation Rule
sakal
वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांवर आळा घालण्यासाठी आणि रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी हा कडक नियम लागू करण्यात आला आहे.
Driving License Cancellation Rule
sakal
लायसन्स रद्द झाल्यानंतरही वाहन चालवल्यास मोटार वाहन (दुरुस्ती) कायदा, 2019 अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे ट्रॅफिक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Driving License Cancellation Rule
sakal
Train delay Reasons
ESakal