Anushka Tapshalkar
भारतातील असंख्य हिंदू भाविक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो म्हणजे कुंभमेळा. या वर्षी हा कुंभमेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत असणार आहेत.
पवित्र गंगेत स्नान करून आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी देशातून लाखो भाविक प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी एकत्र येतात. हा योग नेहमीच येतो असे नाही.
ग्रह, राशी यांच्या स्थितीवरून कुंभमेळा कुठे होणार हे ठरवले जाते. देशात प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार येथे हा मेळा साजरा केला जातो. मात्र या कुंभाचे देखील विविध प्रकार आहेत. चला पुढे जाणून घेऊया...
दर १४४ वर्षांनी येणारा हा कुंभ फक्त आणि फक्त प्रयागराज येथेच साजरा केला जातो. यावर्षी आयोजित केलेला महाकुंभ मेळा हा १४४ वर्षांनी आला आहे.
हा दर १२ वर्षांनी येतो व चार ठिकाणी आयोजित केला जातो. प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार येथे हा साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या कुंभाची तारीख वेगळी असते.
दर ६ वर्षांनी येतो आणि फक्त हरिद्वार आणि प्रयागराज या दोनच ठिकाणी साजरा केला जातो.
दर वर्षी माघ महिन्यात प्रयागराज या ठिकाणी हा साजरा केला जातो.