सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात अक्रोड खाणे फायदेशीर आहे. अक्रोडात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
अक्रोडात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E भरपूर असतात, ज्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग राहते, तसेच केस पातळ होण्यापासून वाचवतात.
अक्रोड मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स तणाव कमी करतात आणि एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवतात. हृदयासाठीही चांगले आहे.
अक्रोडात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक सारखी पोषणतत्त्वे असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि पचनशक्ती सुधारते.
रोज 2-4 अक्रोड खाल्ल्याने टाइप 2 मधुमेह नियंत्रित राहू शकतो.
अक्रोड भिजवून खाल्ल्याने पचन सुधारते, वजन कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते.
रोज सकाळी अक्रोड 5-6 तास भिजवून खा. यामुळे त्याचे पोषणतत्त्वे अधिक प्रभावी असतात.
अक्रोड खाल्या नंतर त्रास होत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.