सकाळ वृत्तसेवा
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश – राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या.
राज्य शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेऊन मागण्या मान्य केल्या. हैदराबाद गॅझेट नोंदींची मागणी मान्य केली.
मराठा समाजाला आता कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार. गावपातळीवर समिती चौकशी करणार.
ग्राम महसूल अधिकारी
ग्रामपंचायत अधिकारी
सहाय्यक कृषी अधिकारी
13 ऑक्टोबर 1967 पूर्वी वास्तव्याचा पुरावा आवश्यक. जमिनीची मालकी नसल्यास प्रतिज्ञापत्र आवश्यक.
गावातील/कुळातील नातलगांना कुणबी प्रमाणपत्र असेल तर प्रतिज्ञापत्र घेऊन अर्जदाराला लाभ मिळणार.
गावपातळीवरील समितीचा अहवाल आणि सक्षम प्राधिकरणाचा निर्णय अंतिम असेल. आता मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा झाला आहे.