सूरज यादव
१७५७ साली अहमदशाह अब्दालीने लाहोरचा मोगल अंमलदार आदिनाबेगला हटवून तैमूरशहा व जहानखान यांची पंजाबच्या बंदोबस्तासाठी नियुक्ती केली.
अब्दाली लाहोरहून निघताच आदिनाबेगने शिखांशी युती करून तैमूरशहावर हल्ले चढवले. हे कळताच अब्दालीने २३ हजार अफगाण सैन्य पाठवले, पण त्यांचा पराभव झाला.
पराभवानंतर आदिनाबेगने दिल्लीतील रघुनाथराव पेशव्यांकडे मदत मागितली. दररोजच्या चालीसाठी १ लाख व मुक्कामासाठी ५० हजार रुपये मदत देण्यात आली.
रघुनाथराव लाहोरकडे निघाले असताना ख्वाजा मिर्झाही सोबत आला. मानाजी पायगुडे व आदिनाबेग यांनी लाहोरवर चाल करताच तैमूरशहा व जहानखान पळून गेले.
मानाजी पायगुडे यांनी २० एप्रिल १७६८ रोजी लाहोर किल्ल्यावर मराठ्यांचा झेंडा फडकावला. मराठ्यांची धडकी बसून युद्ध न करताच तैमूरशहा पळून गेला.
मराठ्यांनी अफगाणांचा पाठलाग केला. गंगाधर बाजी भिवराव व गोपाळराव गणेश यांच्या मदतीने चिनाब नदीपर्यंत अफगाणींना पळवून लावलं. वजिराबाद येथे मोठी लूट करण्यात झाली.
चिनाब नदी ही खोल, थंड व वहाणारी नदी असल्याने आणि होड्या व तोफखाना नसल्याने मराठ्यांनी नदी पार न करण्याचा निर्णय़ घेतला. त्यामुळे अफगाण सैन्य अटकमार्गे काबूलकडे पळाले.