Aarti Badade
चव वाढवण्यासाठी स्वयंपाकात तेलाचा जास्त वापर करण्याची सवय कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, वजन वाढणे आणि फॅटी लिव्हर यांसारख्या गंभीर समस्यांना आमंत्रण देते.
cooking oil per person per month
Sakal
ICMR च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका निरोगी व्यक्तीला दिवसाला साधारण ३ ते ४ चमचे म्हणजेच १५ ते २० ml तेल पुरेसे मानले जाते.
cooking oil per person per month
Sakal
आरोग्य तज्ज्ञांच्या गणितानुसार, निरोगी आरोग्यासाठी एका व्यक्तीला महिन्याभरात सुमारे ५०० ml म्हणजेच अर्धा लिटर तेल पुरेसे ठरते.
cooking oil per person per month
Sakal
तुमच्या घरात ४ सदस्य असतील, तर संपूर्ण कुटुंबासाठी महिन्याला साधारण २ लिटर तेल पुरेसे आहे; यापेक्षा जास्त वापर शरीरासाठी धोक्याचा संकेत असू शकतो.
cooking oil per person per month
Sakal
तेलातील अति कॅलरीजमुळे पोटाचा घेर वाढतो, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन 'बॅड कोलेस्ट्रॉल' वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका संभवतो.
cooking oil per person per month
Sakal
घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि हाय बीपी किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांच्या जेवणातील तेलाचे प्रमाण अत्यंत मर्यादित आणि नियंत्रित असावे.
cooking oil per person per month
Sakal
स्वयंपाकासाठी नॉन-स्टिक पॅन, बेकिंग किंवा एअर फ्रायरचा वापर केल्यास आणि वाफवलेले पदार्थ आहारात वाढवल्यास तेलाचा वापर ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
cooking oil per person per month
Sakal
तळण्यासाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे टाळावे; कारण अशा तेलात घातक रसायने तयार होऊन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
cooking oil per person per month
Sakal
reduce belly fat after meals
Sakal