Anuradha Vipat
‘बिग बॉस’च्या सीझन 3मध्ये विनोद कांबळी याने ‘वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट’म्हणून एंट्री केली होती.
विनोद कांबळीने त्या सीझनच्या पाचव्या आठवड्यात घरात एंट्री केली होती.
पण फक्त 14 दिवसांतच विनोद कांबळी या रिॲलिटी शोमधून घराबाहेर पडला होता.
15 वर्षांपूर्वी सलमान खान नव्हे तर अमिताभ बच्चन हे या शोचे होस्ट होते.
या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विनोद कांबळीला दर आठवड्याला दीड ते दोन लाख रुपये फी देण्यात आली होती.
ही फी त्यावेळच्या शोमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या तुलनेत खूप जास्त होती
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आहे.