Pranali Kodre
आशिया कप २०२५ स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले, पण या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानची हस्तांदोलन टाळले.
India vs Pakistan
Sakal
यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाने त्या सामन्यातील सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची आयसीसीकडे तक्रार केली की त्यांनी खिलाडूवृत्तीच्या नियमांचे उल्लंघन केले. हस्तांदोलन न करण्यास सांगण्यात त्यांची भूमिका होती.
Pakistan Cricket Team
Sakal
मात्र आयसीसीने ही तक्रार अमान्य करत पायक्रॉफ्ट यांना आशियाई क्रिकेट परिषदेच्याच अधिकाऱ्याने नाणेफेकीवेळी हस्तांदोलन होणार नसल्याचे सांगितले होते, असं म्हटलं.
Referee Andy Pycroft Earnings
Sakal
दरम्यान पायक्रॉफ्ट यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ते झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी ३ कसोटी आणि २० वनडे सामने खेळले आहेत.
Referee Andy Pycroft Earnings
Sakal
त्यांनी १९ वर्षांखालील झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे, तसेच ते निवडकर्तेही राहिले आहेत. त्यांनी काही काळ राष्ट्रीय संघालाही प्रशिक्षण दिले आहे.
Referee Andy Pycroft Earnings
Sakal
सध्या ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी सामनाधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी पुरुषांच्या १०३ कसोटी, २४८ वनडे आणि १८५ टी२० सामन्यांत, तर महिलांच्या २१ टी२० सामन्यांत सामनाधिकारी म्हणून काम केले आहे.
Referee Andy Pycroft Earnings
Sakal
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार आयसीसीच्या मानधन प्रणालीचा विचार करता त्यांचे नेटवर्थ साधारण १५ ते २५ कोटीच्या आसपास आहे. पण याबाबत अधिकृत माहिती नाही.
Referee Andy Pycroft Earnings
Sakal
आयसीसी त्यांच्या एलिट पॅनलमधील प्रत्येक सामनाधिकाऱ्याला प्रत्येक सामन्यासाठी वेगवेगळे मानधन मिळाले.
Referee Andy Pycroft Earnings
Sakal
सामनाधिकाऱ्याला एका वनडेसाठी १५०० डॉलर म्हणजेच, साधारण एक लाख ३० हजारांपेक्षा अधिक रुपये मिळतात. त्यांना एका कसोटीसाठी २ ते २.५ लाख रुपये मिळतात, तर टी२० सामन्यासाठी ८० हजार रुपये मिळतात.
Referee Andy Pycroft Earnings
Sakal
Smriti Mandhana
Sakal