पाच रुपयांचं नाणं पाडायला किती खर्च येतो?

संतोष कानडे

आपण एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये आणि दहा रुपये; या नाण्यांद्वारे व्यवहार करतो

परंतु ही नाणी पाडण्यासाठी किंवा बनवण्यासाठी किती खर्च येतो ते तुम्हाला माहितंय का?

एका रुपयाचं नाणं बनवण्यासाठी त्याच्या मूल्यापेक्षा जास्त खर्च येतो. २०१८ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत माहिती दिली होती

१ रुपयाचं नाणं पाडण्यासाठी १.११ रुपये लागतात तर दोन रुपयांच्या नाण्यासाठी १.२८ रुपये लागतात

पाच रुपयांच्या नाण्यासाठी ३.६९ रुपये खर्च येतो. दहा रुपयांचं नाणं ५.५४ रुपयांमध्ये तयार होतं.

सगळी नाणी आणि नोटा सरकारकडून छापल्या जातात. दोन रुपयांपासून ५०० रुपयांपेर्यंतच्या नोटा RBI छापतं.

आधी २००० रुपयांची नोटही आरबीआय छापत होतं, परंतु आता ही नोट बंद करण्यात आलेली आहे.

एका रुपयाचं नाणं स्टेनलेस स्टिलपासून बनतं. एका रुपयाच्या नाण्यााच व्यास २१.९३ मीमी असतो. तर जाडी १.४५ मी असते.

रुपयाच्या शिक्क्याचं वजन ३.७६ ग्राम असतं. हे सगळे शिक्के मुंबई आणि हैदराबादमध्ये भारतीय टाकसाळ (IGM) मध्ये पाडले जातात.

मुघलांच्या हरममध्ये नेमकं काय व्हायचं?

<strong>येथे क्लिक करा</strong>