पुजा बोनकिले
पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून चोख उत्तर म्हणून पाकिस्तानमधील दहशवाद्यांचे ९ तळ्यांवर हल्ला केला.
'ऑपरेशन सिंदूर' ला यशस्वी बनवण्यासाठी राफेल विमानाने मदत केली.
राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढली आहे.
अत्याधुनिक एव्हियोनिक्स, रडार प्रणाली आणि शस्त्रास्त्रांसह, राफेल हे जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक आहे.
भारताच्या विकसित होत असलेल्या लष्करी सिद्धांतातील एक महत्त्वाची संपत्ती आहे.
क्रूझिंग फ्लाइट दरम्यान राफेल विमान प्रति तास सुमारे २,५०० लिटर इंधन वापरते.
तसेच मॅन्युव्हर किंवा आफ्टरबर्नर वापरामुळे हे प्रमाण प्रति तास ९,००० लिटरपर्यंत पोहोचू शकते.