Sandip Kapde
शिवरायांनी राष्ट्ररक्षण, राज्यसंवर्धन आणि भविष्यातील गरजांसाठी निधीची ठोस व दूरदृष्टीपूर्ण योजना आखली होती.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
पैसा नसल्यास कोणतेही मोठे कार्य अशक्य आहे, हे ओळखून महाराजांनी आर्थिक नियोजनावर विशेष भर दिला.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
उपलब्ध ऐतिहासिक पत्रांपैकी दोन पत्रांत शिवाजी महाराजांनी राखीव निधीची स्पष्ट तरतूद नमूद केली आहे.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
इ.स. १६७१–७२ मधील पत्रातून गडकोटांच्या दुरुस्तीसाठीची सविस्तर आकडेवारी समोर येते.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
राजधानी असलेल्या रायगडासाठी सर्वाधिक म्हणजे ५०,००० रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णगड, प्रतापगड, पुरंदर आणि राजगडासाठी प्रत्येकी १०,००० रुपये राखीव ठेवले होते.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
प्रचंडगड, प्रसिद्धगड, विशाळगड, महीपतगड, सुधागड, लोहगड, सबळगड तसेच श्रीवर्धन व मनरंजनसाठी प्रत्येकी ५,००० रुपयांची तरतूद होती.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
कोरिगडसाठी ३,००० रुपये तर सारसगड आणि महीधरगडसाठी प्रत्येकी २,००० रुपये मंजूर केले होते.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
मनोहरगडासाठी १,००० रुपयांची तरतूद करण्यात आल्याची नोंद आढळते.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
किरकोळ खर्चांसाठी एकूण ७,००० रुपयांची स्वतंत्र तरतूद ठेवण्यात आली होती.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
ही आकडेवारी शिवरायांची आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय कौशल्य अधोरेखित करते.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
गडकोटांच्या दुरुस्तीसाठी केलेली ही निधीव्यवस्था आजही शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराचे प्रतीक मानली जाते.
chhtrapti Shivaji Maharaj
esakal
Village of Temples Maharashtra
esakal