Aarti Badade
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, भारतीय महिलांकडे तब्बल २४,००० टन सोने आहे.
भारतीय महिलांकडील सोने अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशिया या देशांच्या एकत्रित साठ्यापेक्षाही जास्त आहे!
भारतीय संस्कृतीत सोने हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. लग्नसमारंभ, सण, पूजांमध्ये याचे महत्त्व अमूल्य आहे.
भारतीय महिला दरवर्षी नवनवीन सोनं खरेदी करतात, ज्यामुळे सोन्याचा साठा सातत्याने वाढतो आहे.
भारतातील एकूण सोन्यापैकी ४०% दक्षिण भारतात आहे, आणि त्यातही २८% सोनं फक्त तामिळनाडूतील महिलांकडे आहे.
केवळ काही वर्षांपूर्वी २०२०-२१ मध्ये महिलांकडे २१,००० टन सोने होते. साठा प्रचंड वेगाने वाढतो आहे.
भारतीय कायद्यानुसार विवाहित महिला ५०० ग्रॅमपर्यंत, करमुक्त सोनं अविवाहित महिला २५० ग्रॅमपर्यंत,पुरुष १०० ग्रॅमपर्यंतच.
ही आश्चर्यकारक बाब म्हणजे, जगातल्या एकूण सोन्याच्या ११ टक्के सोनं फक्त भारतीय महिलांकडे आहे!
सोने केवळ दागिने नाही, तर पिढ्यांपासून पिढ्यांकडे जाणारी सांस्कृतिक ठेव आहे.