Payal Naik
'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील कार्यक्रमाने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. तब्बल १० वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांना हसवत होता.
'चला हवा येऊ द्या' म्हटलं की एक नाव आपोआप आपल्या तोंडावर येतं ते म्हणजे निलेश साबळे.
या कार्यक्रमाची संकल्पना निलेशचीच होती. त्याचं दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन तोच करायचा.
रात्ररात्रभर बसून या कार्यक्रमाचं लेखन करणं आणि सगळी घडी व्यवस्थित बसवणं हे निलेश चोख करायचा.
आता 'चला हवा येऊ द्या २' येणार आहे. मात्र या सीझनचा सूत्रसंचालक निलेश साबळे नसून अभिजीत खांडकेकर आहे.
मात्र 'चला हवा येऊ द्या' साठी निलेशला किती मानधन मिळायचं तुम्हाला ठाऊक आहे का?
मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या' या शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी निलेश साबळे एक ते दीड लाख रुपये इतकं मानधन घ्यायचा.
'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर 'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा नवा शो निलेश साबळेने सुरू केला होता. मात्र त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
वाढदिवसाला धबधब्यावर पोहोचली सई ताम्हणकर; हे ठिकाण नेमकं कुठेय?