सकाळ वृत्तसेवा
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. वाढती महागाई, वाढते कर्ज, आणि बेरोजगारीमुळे सामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे.
2024 मध्ये पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न $1,588 (सुमारे ₹1.32 लाख) इतके आहे.
2023 मध्ये पाकिस्तानच्या जीडीपीत -0.2% घट झाली होती, तर 2024 मध्ये तो 2.4% पर्यंत वाढला आहे.
2025 मध्ये पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 5.1% आहे, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये 84.5% लोकसंख्या दररोज $6.85 (580 रुपये) पेक्षा कमी उत्पन्नावर जगते, तर 39.8% लोकसंख्या $3.65 (309 रुपये) पेक्षा कमी उत्पन्नावर जीवन जगते
पाकिस्तानची अर्थव्यवस्था मुख्यतः कापड, अन्न प्रक्रिया, औषधनिर्मिती आणि फ्रीलांसिंगवर आधारित आहे. 2024 मध्ये देशाची एकूण निर्यात $38.9 अब्ज डॉलर होती, ज्यामध्ये कापड उद्योगाचा वाटा $16.3 अब्ज डॉलर आहे.
पाकिस्तानवर सध्या $131 अब्ज डॉलरहून अधिक परकीय कर्ज आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार आहे.
ग्रामीण भागात बेरोजगारी आणि कमी उत्पन्नामुळे लोकांचे जीवन अधिक कठीण झाले आहे. अनेक लोक अत्यल्प वेतनावर काम करत आहेत.