शिवरायांच्या काळात कुलकर्ण्यांना किती वेतन मिळत होतं?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसुभेदारांच्या सहकार्याने चौल सुम्यासाठी कुलकर्ण्यांचे हक्क निश्चित केले.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

वतनपत्र

कुलकर्ण्यांच्या वतनपत्रात त्यांच्या विविध हक्कांचा सविस्तर उल्लेख आढळतो.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

रोख रक्कम

कुलकर्ण्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त रोख रक्कम स्वीकारण्याचा हक्क होता.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

हिस्सा

ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या महसुलाचा ठराविक वाटा कुलकर्ण्यांना दिला जात असे.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

चांभार

गावच्या चांभाराकडून दरवर्षी जोडे मिळणे हे कुलकर्ण्यांचे पारंपरिक अधिकार होते.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

वस्तू

खर्चपट्टीतून गावकऱ्यांकडून कुलकर्ण्यांना परंपरागत वस्तू दिल्या जात असत.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

अतिरिक्त महसुल

सादिलवारपट्टीतून मिळणाऱ्या अतिरिक्त महसुलातील काही हिस्सा कुलकर्ण्यांना देण्यात येत असे.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

लोणी

लोणी विक्यापासून ठरावीक प्रमाणात तूप मिळणे हा कुलकर्ण्यांचा अधिकार होता.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

वेठबिगारी

वेठबिगारीद्वारे विनामूल्य काम करवून घेण्याचा हक्क कुलकर्ण्यांना होता.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

घुगरी

सुगीच्या हंगामात तयार पिकाचा हिस्सा "घुगरी" म्हणून कुलकर्ण्यांना मिळत असे.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

वानवळा

तयार झालेल्या पिकांचे व फळांचे नमुने गोळा करण्याचा "वानवळा" हक्क कुलकर्ण्यांना होता.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

ग्रामपंचायत

ग्रामपंचायतीचे हिशोब ठेवण्याचे काम कुलकर्ण्यांच्या जबाबदारीत असे.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

जमिनींची नोंदणी

गावातील जमिनींची नोंदणी, त्याचा तपशीलवार वर्णन नोंदवणे हे कुलकर्ण्यांचे महत्त्वाचे काम होते.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

शेती

शेती करणाऱ्याकडून मासिक भत्ता (मुशहिरा) गोळा करण्याचा अधिकार कुलकर्ण्यांना होता.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

अधिकार

घर बांधण्यासाठी मिराशी जमिनीचा उपयोग करण्याचा अधिकार कुलकर्ण्यांना होता.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

दसरा-दिवाळी

पाटलाच्या मानानंतर दसरा-दिवाळीला कुलकर्ण्यांच्या घरासमोर सनई-चौघडा वाजवला जात असे.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

तेल

तेल्याकडून प्रतिदिनी ठरावीक टक्के तेल मिळणे हा कुलकर्ण्यांचा हक्क होता.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

सरपण

वतनपत्रात उल्लेख असलेल्या हक्कांव्यतिरिक्त कुलकर्ण्यांना विशिष्ट सणांच्या वेळी सरपण आणि भाज्या मिळत.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

कागदपत्रे

शाई तयार करण्यासाठी तेल आणि कागदपत्रे बांधण्यासाठी कापड गावाच्या निधीतून पुरवले जात असे.

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

कुलकर्णी पद

कुलकर्णी पद वंशपरंपरागत असले तरी ते विकत घेणे किंवा गहाण टाकणे शक्य होते. (शिवकाल ग्रंथात ही माहिती दिली आहे)

salary of Kulkarni during Shivaji Maharaj era | esakal

कसा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव?

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal
येथे क्लिक करा