वयोमानानुसार दररोज किती मीठ खावे?

Aarti Badade

०-१२ महिने वयातील मुलं

या वयातील मुलांचे मूत्रपिंड पूर्णपणे विकसित झालेले नसते, त्यामुळे त्यांना खूप कमी प्रमाणात मीठ दिलं पाहिजे. एकूण एक ग्रॅमपेक्षा कमी मीठ दिलं जातं. आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युलामधून सोडियम मिळते.

salt | Sakal

१-३ वर्षे वयाचे मुलं

या वयातील मुलांना दररोज साधारणपणे २ ग्रॅम मीठ देणे योग्य आहे. त्यांच्या आहारात मीठ कमी प्रमाणात असावे.

salt | Sakal

४-८ वर्षे वयाचे मुलं

या वयातील मुलांसाठी मीठाचे प्रमाण ३ ग्रॅम पर्यंत असू शकते. तरीही, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे, कारण त्यात जास्त मीठ असते.

salt | Sakal

९-१८ वर्षे वयाचे मुले

या वयाच्या मुलांना लहान मुलांपेक्षा जास्त मीठाची आवश्यकता असते. त्यांना दररोज ५ ग्रॅम मीठ दिले जाऊ शकते, जे एका चमच्याइतके असते.

salt | Sakal

१९ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक

या वयाच्या व्यक्तींना सामान्यतः ५ ग्रॅम पर्यंत मीठ खाण्याची योग्य असू शकते. ज्याना उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असल्यास, मीठाचे सेवन कमी करणे आवश्यक आहे.

salt | Sakal

६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक

वय वाढल्यानंतर मूत्रपिंडांमध्ये सोडियमची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे या वयातील लोकांनी दिवसाला फक्त ५ ग्रॅम मीठ खाणे महत्त्वाचे आहे.

salt | Sakal

आरोग्य स्थिती

जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असतील, तर मीठ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

salt | Sakal

आहारात

तुमच्या आहारात मीठाच्या प्रमाणाचा योग्य अंदाज घेणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

salt | Sakal

तेजश्री प्रधानचे "लोक काय म्हणतील?" यावरचे उत्तर काय अन् ती आनंदी कशी राहते 'हे' जाणून घ्या

Tejashree Pradhan's Answer to What Will People Think and Her Path to Happiness | Sakal
येथे क्लिक करा