सकाळ डिजिटल टीम
तेजश्री प्रधान तिच्या एका मुलाखतीत लोकांच्या वागण्याबद्दल, लोकांच्या समोर स्वताची बाजू मांडताना काय वागावे कसे वागावे याबद्दल सांगते.
तेजश्री प्रधान सांगते, "लोक काय म्हणतील, यावर विचार करत आयुष्य घालवणे चुकीचं आहे. लोक तुमच्या आनंदातही नसतात आणि दुखातही नसतात."
"त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने मी माझ आयुष्य का थांबवू ? मी ते जगायच कधीच थांबवत नाही."
पारिस्थिती माझा हातात नसली तरी, त्या पारिस्थितीत वागायच काय हे नक्कीच माझा हातात आहे. आणि तिथे आनंदी रहायच हे मी ठरवलयं मग तो आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.
तेजश्री प्रधान पुढे सांगते की, "खोट्या गोष्टीना स्पीड असतो पण खऱ्या गोष्टीना स्टॅमिना असतो. म्हणून पेशेंस ठेवा"
त्याचबरोबर जग गोले ना? त्यामुळे इकडून जाणारी माणसे उद्या कुठला तरी प्रवासात माझ्यासमोर येणारेत.
"त्यामुळे इकडून ते लांब असताना त्यांना ओरडून आपली बाजू सांगण्यापेक्शा ते जेव्हा आपल्या समोर येतील तेव्हा ते मला अनुभवतील"
"मला अनुभवल्यानंतर ते जजमेंट घेतील. तेव्हा ते जजमेंट काय असणारे हे त्यांच्या कुवती प्रमाणे असणारे. ज्यांची कुवत असेल ते समजून घेतील ज्यांची नसेल त्यांच्या बाबतीत मला कुठला आटापीटाच नाही करायचा."
ती पुढे म्हणते लोकांना जे वाटतंय ते वाटून घ्या मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे.