Saisimran Ghashi
वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात.
पण तुम्हाला माहिती आहे काय नेमका किती वेळ व्यायाम केल्याने वजन कमी होते.
आठवड्यातून कमीत कमी 300 मिनीटे व्यायाम करणे शरीरासाठी चांगले असते.
पण जर तुम्हाला तब्बेत कमी करायची असेल तर ठराविक वेळ व्यायाम केला पाहिजे.
जर तुम्ही जास्त तीव्रतेचे व्यायाम (जसे की हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, HIIT) करत असाल, तर 20 ते 30 मिनिटे पुरेसे असू शकतात.
पोट किंवा शरीरातील इतर स्नायूंना ताण देणारा व्यायाम (जसे की वजन उचलणे किंवा बॉडीवेट एक्सरसाइजेस) 2 ते 3 वेळा आठवड्यात करणे आवश्यक आहे.
वजन कमी करण्यासाठी व्यायामासह पुरेशी झोप आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.