शिवाजी महाराजांच्या निधनावेळी रायगडावर किती खजिना होता?

सकाळ वृत्तसेवा

रायगडावर किती खजिना होता?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या वेळी रायगडावर किती संपत्ती जमा झाली होती त्याचे तपशील वाचून तुमचं डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

chhatrapati shivaji maharaj | Sakal

सोनं आणि चांदी

रायगडावर ९ खंडी सोनं, ५ खंडी चांदी, ५ लाख सोन्याचे होन आणि ३ लाख होन अधिकाऱ्यांकडे खरेदीसाठी दिलेले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

शस्त्रसज्जता

स्वराज्याकडे ३० हजार तलवारी, ५० हजार दुधारी तलवारी, ४० हजार धनुष्य, १८ लाख बाण, ४० हजार भाले, ६० हजार ढाली आणि ६० हजार लाँग डर्कस् होती.

Chhatrapati Shivaji Maharaj Throne | Sakal

मसाले आणि उपयोगी पदार्थ

२७० खंडी सैंधव, २०० खंडी जिरे, २०० खंडी गोपीचंद, २०० खंडी गंधक आणि प्रचंड प्रमाणात सुगंधी पदार्थ साठवलेले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

धातूंचा साठा

गडावर ३ खंडी तांबे, ४५० खंडी शिसे, २० खंडी लोखंड, ४०० खंडी जस्त मिश्र धातू आणि २७२ खंडी ब्राँझ इतका धातूंचा साठा होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

अन्नधान्याचा साठा

धान्यांमध्ये १७ हजार खंडी भात, ७० हजार खंडी तेल, तसेच मोठ्या प्रमाणात डाळी, साखर आणि तंबाखूचा साठा होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

कपड्यांचा खजिना

रायगडावर ४००० पांढऱ्या ठाण्या, १००० बहऱ्हाणपुरी कापड, ३००० सामान्य कपडे, ४००० पैठणीचे तागे आणि लाखभर हलकं कापड होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

मौल्यवान रत्ने

हा खजिना ५१ हजार तोळे सोनं, २०० तोळे माणकं, १००० तोळे मोती, ५०० तोळे हिरे आणि ४० हजार डर्कस् ने भरलेला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

इतर किल्ल्यांवर संपत्ती

रायगडाव्यतिरिक्त इतर किल्ल्यांवरही ३० लाख होनांची संपत्ती होती. जामदारखान्याची तपासणी १६८० साली खुद्द संभाजीराजांनी केली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

हाय प्रोटीन पोहे बनवण्यासाठी कोणते पदार्थ टाकावे?

येथे क्लिक करा