Vrushal Karmarkar
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात पुणे पोलिसांनी डॉ. प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतले आहे.
डॉ. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे जावई आहेत. पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खराडी पोलीस ठाण्यात या ७ जणांच्या विरोधात अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पार्टीमध्ये ५ पुरुष आणि २ महिलांना अटक केली आहे. पोलिसांकडून या आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. या छाप्यात अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.
या पार्टीत आरोपींकडून ४१ लाख रुपये ज्यामध्ये २.७० ग्रॉम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॉम गांजा सदृश पदार्थ, १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट आणि दारू तसेच बियरच्या बॉटल जप्त केले.
या आरोपींनी आफ्टर पार्टी करण्यासाठी खराडीमधील स्टेबर्ड हॉटेलमध्ये बुकींग केली होती. यानंतर त्यांनी पार्टी केली. मात्र सकाळच्या सुमारास तेथे पोलिसांचा छापा पडला.
प्रांजल खेवलकर यांनी हे बुकिंग केले होते. याची पावतीही समोर आली आहे. हे बुकींग २५ ते २८ जुलैपर्यंत केले होते. १०१ आणि १०२ या दोन रुममध्ये फ्लॅट बुक होते.
या रुमच्या भाडे १० हजार ३५७ रुपये इतके होते. यामधील एका फ्लॅटचे बुकिंग २५ ते २८ तारखेपर्यंत केले होते. तसेच दुसऱ्या रुमचे बुकिंग २६ ते २७ जुलैपर्यंत केले होते.
बॅड कोलेस्ट्रॉलला 'नो' म्हणायचंय? मग 'हे' ७ ड्रायफ्रुट्स नक्की खा!