Aarti Badade
असंतृप्त फॅटी अॅसिड्स आणि प्रथिनांनी भरलेले, बदाम बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. सकाळी भिजवून खाणं फायदेशीर!
हेझलनट्समधील फिनोलिक कंपाउंड बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाच्या आरोग्याला बळकटी देतं.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सयुक्त अक्रोड, एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल) कमी करतं आणि मेंदू व हृदयासाठी फायदेशीर आहे.
सेलेनियम आणि हेल्दी फॅट्स असलेले ब्राझील नट्स कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवतात, पण प्रमाणातच खावेत.
शेंगदाण्यांमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात, जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि एनर्जी वाढवतात.
पिस्ते अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्सचा उत्तम स्रोत आहे, जे हृदयाचे संरक्षण करतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात.
खारीकमधील फायबर्स आणि पोटॅशियम कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. नैसर्गिक गोडवा असलेले हे सुपरफूड आहे.