राजकारणात एंट्री, संपत्तीत भारी वाढ! हरभजन सिंगची एकूण मालमत्ता किती? आकडा वाचून बसेल धक्का

Vrushal Karmarkar

राघव चड्ढा

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आणि इतर सात खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या यादीत माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचाही समावेश आहे.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

आम आदमी पक्ष

हरभजन सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत असून त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हरभजन सिंग २१ मार्च २०२२ रोजी आम आदमी पक्षात सामील झाले.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

हरभजन सिंग

त्याच दिवशी पक्षाने त्यांना पंजाबमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले. १० एप्रिल २०२२ रोजी त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

राज्यसभा

राज्यसभेत पोहोचल्यानंतर या क्रिकेटपटूने संसदेत क्रीडा आणि खेळाडूंशी संबंधित मुद्दे उपस्थित केले.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

मागणी

त्यांनी पंजाबमधील क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची, खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याची आणि तरुणांना अमली पदार्थांपासून दूर ठेवून त्यांना खेळांमध्ये गुंतवून ठेवण्याची मागणी केली.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

एकूण मालमत्ता

एडीआर अहवालानुसार, राज्यसभेत दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात हरभजन सिंग यांनी म्हटले आहे की, त्याची एकूण मालमत्ता ₹८१,८०,१०,९८६ इतकी आहे.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

समालोचन

हरभजन सध्या क्रिकेट समालोचन आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून पैसे कमावतात. त्यांना बीसीसीआयकडून पेन्शनही मिळते. ब्रँड एंडोर्समेंट हा हरभजन यांच्या उत्पन्नाचा आणखी एक प्रमुख स्रोत आहे.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

प्रवेश

त्यांनी क्रीडा-संबंधित व्यवसाय आणि इतर गुंतवणुकींमध्येही प्रवेश केला आहे. खासदार म्हणून त्यांना पगार आणि भत्तेही मिळतात. त्यांची देशभरातील विविध शहरांमध्ये मालमत्ता आहे.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

स्थावर मालमत्ता

सांताक्रूझ, मुंबई, चंदीगड, मोहाली, जालंधर, अहमदाबाद आणि आंध्र प्रदेशातील नलगंडा जिल्ह्यात त्याच्या एकूण ५९ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता आहेत.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

घराचे मूल्य

हरभजन सिंग यांच्या चंदीगडमधील घराचे मूल्य २८ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे लाखो रुपयांची महागडी घड्याळे, सोने, हिरे आणि एलआयसी पॉलिसीसुद्धा आहेत.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

रक्कम

त्यांच्याकडे चार वाहनेही आहेत. हरभजन सिंगने बॉण्ड्स, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली असून, त्याच्या खात्यात १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे.

Harbhajan Singh wealth

|

ESakal

भारतातील 'या' तुरुंगात भाड्याने राहू शकता; एक दिवसाचे भाडे वाचून ऐकून व्हाल थक्क...

living in prison on rent

|

ESakal

वाचा सविस्तर...