संतोष कानडे
मूळचा नागपूरचा आणि पूर्वाश्रमीचा पत्रकार असलेल्या प्रशांत कोरटकरकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचं पुढे येत आहे.
इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकरकडे असलेल्या गाड्यांची माहिती दिली होती.
कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ तर केलीच पण त्यासोबतच त्याने महापुरुषांबद्दलही अपशब्द वापरले.
प्रशांत कोरटकरकडे ६७ कोटी रुपयांच्या कार आहेत, असा आरोप अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे.
कोरटकर हा विषारी डोक्याचा शातीर आणि बदमाश माणूस असल्याचंही सरोदे यांनी मागे म्हटलं होतं.
प्रशांत कोरटकरचे अनेक भाजप नेत्यांसोबत फोटो आहेत, त्यामुळे त्याने नेमकं पैसे कसे कमावले, असा प्रश्न उपस्थित होतोय.
कोरटकरने मोबाईल डेटा डिलिट करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस त्याचा डेटा रिकव्हर करीत आहेत.
सोमवार, दि. २४ मार्च रोजी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणामध्ये ताब्यात घेतलं.
अटकेपासूनच्या संरक्षणासाठी त्याने कोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टातील सुनावणीआधीच त्याला अटक करुन कोर्टासमोर हजर केलं.
कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्या इतर मालमत्तेबाबत तपासातून माहिती पुढे येऊ शकते.