मंगळावर माणूस गेला तर त्याचं वजन किती होईल?

Varsha Balhe

वजन

पृथ्वीवर तुमचं वजन ६० किलो असेल, तर मंगळावर गेल्यावर ते किती भरेल? ऐकून आश्चर्य वाटेल, पण मंगळावर तुमचं वजन खूपच कमी होईल. यामागचं कारणही रंजक आहे.

Weight on Mars

|

esakal

पृथ्वीपेक्षा मंगळावर वजन कमी का भरतं?

मंगळ ग्रहाचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर गुरुत्वाकर्षणाची ताकद केवळ ३८ टक्के आहे. त्यामुळे मंगळावर गेल्यावर तुमचं वजन कमी भरेल.

Weight on Mars

|

esakal

६० किलो वजन असेल तर किती भरेल?

समजा, पृथ्वीवर तुमचं वजन ६० किलो आहे. तर मंगळावर गेल्यानंतर वजनकाट्यावर तुमचं वजन साधारण २२.८ किलो दिसेल. म्हणजेच पृथ्वीच्या तुलनेत तुमचं वजन जवळपास ३७ किलोने कमी होईल.

Weight on Mars

|

esakal

१०० किलो वजन असेल तर?

पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचं वजन १०० किलो असेल, तर मंगळावर ते केवळ ३८ किलो भरेल. म्हणजेच तिथे वजनात तब्बल ६२ किलोची घट दिसेल.

Weight on Mars

|

esakal

शरीर

मंगळावर गेल्यानंतर तुमचं वजन कमी होईल; पण तुमच्या शरीराचं वस्तुमान बदलणार नाही. पृथ्वीवर तुमचं वस्तुमान ६० किलो असेल, तर मंगळावरही ते ६० किलोच राहील. बदल फक्त गुरुत्वाकर्षणामुळे जाणवणाऱ्या वजनात होतो.

Weight on Mars

|

esakal

उड्या

मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे पृथ्वीच्या तुलनेत तिथे उंच उडी मारणं सोपं होईल. तसंच, एखादी वस्तू उचलतानाही ती पृथ्वीच्या तुलनेत हलकी जाणवेल. मात्र, मंगळावरील वातावरण आणि स्पेससूटमुळे हालचाली करणं सोपं असेलच असं नाही.

Weight on Mars

|

esakal

मंगळावर वजन कमी, पण पृथ्वीवर परतल्यावर?

मंगळावरून पृथ्वीवर परतल्यानंतर तुमचं वजन पुन्हा पूर्वीसारखं दिसेल. कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण मंगळापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मंगळावर २२.८ किलो दिसणारं ६० किलो वजन पृथ्वीवर पुन्हा ६० किलोच दिसेल.

Weight on Mars

|

esakal

पूर्वीच्या काळात सिनेमागृह कसे असायचे? जुने फोटो पाहिलेत का?

Old Cinema Theatres in India

|

esakal

येथे क्लिक करा