५० वर्षांपूर्वी मुंबईतला जुहू बीच कसा दिसत होता? पाहा कधीही न पाहिलेले फोटो

Mansi Khambe

जुहू बीच

मुंबई उपनगर जिल्ह्यातील जुहू पश्चिम किनारपट्टीवर वसलेला एक उपनगर-भाग आहे. हा परिसर 'जुहू बीच'साठी ओळखला जात असून हे क्षेत्र सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू वस्त्यांपैकी एक मानले जाते.

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

मराठी ग्रंथ

१५ व्या ते १७ व्या शतकातील 'माहिकावतीची बखर' या मराठी ग्रंथात जुहूचा उल्लेख केला आहे. त्यानुसार १२ व्या शतकात राजा प्रताप बिंब यांचा सेनापती बाळकृष्णराव सोमवंशी याने हा भाग जिंकून घेतला होता.

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

इतिहास

एकोणिसाव्या शतकात जुहू हे एक बेट होते. साल्सेटच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेला हा वाळूचा एक लांब आणि अरुंद पट्टा होता, जो समुद्रसपाटीपासून एक-दोन मीटर उंच होता.

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

गांधी ग्राम

जुहू परिसरात अनेक नामवंत व्यक्तींची घरे, उच्चभ्रू वस्त्या आणि हॉटेल्स आहेत. तसेच किनाऱ्याच्या उत्तर टोकाला 'गांधी ग्राम' आहे, जिथे महात्मा गांधी वकिली करत असताना वास्तव्यास होते.

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

पर्यटनस्थळ

मुंबईतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या जुहू चौपाटीवर पर्यटकांची नेहमीच गर्दी दिसून येते. सध्या सोशल मीडियावर ५० वर्षांपूर्वीचे जुहू बीचचे फोटो समोर आले आहेत.

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

५० वर्षांपूर्वीची जुहू चौपाटी

सध्या मुंबईची ओळख असणाऱ्या जुहू चौपाटीवर कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक आणि इतर कचरा साचला आहे. मात्र ५० वर्षांपूर्वी हा बीच अगदी गोवा सारखा असल्याचे दिसत आहे.

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

स्वच्छ परिसर

जुहू चौपाटी ५० वर्षांपूर्वी शांत, निवांत आणि स्वच्छ परिसर होता. येथे भारतीयांसह परदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असायची. पर्यटकांची मोठी संख्या असूनही कुठेही घाण किंवा अस्वच्छता नव्हती.

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

व्हिडिओ

ट्विटरवर 'मुंबई हेरिटेज' या अकाउंटवर १९७९ सालमधील जुहू चौपाटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कमेंट्स

यावर उत्तरेकडील देहातींनी (रानटी/अडाणी लोकांनी) त्यावर आक्रमण केले आणि आमचे सुंदर मुंबई शहर उद्ध्वस्त केले, अशा कमेंट्स केल्या आहेत.

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

विमानात १३ नंबरचे सीट का नसते? कारण वाचून वाटेल आश्चर्य

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

येथे क्लिक करा