शिवरायांच्या राज्याभिषेकाची बातमी खेडापाड्यात कशी पोहोचली?

सकाळ वृत्तसेवा

राज्याभिषेकाआधीची एक घटना

राज्याभिषेकाचा निर्णय होण्याआधीच देशभरात जोरदार चर्चा सुरू होती. पण काही दुर्गम भागातील रयत अजूनही अनभिज्ञ होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

कोकणातून गोव्याकडे निघालेला फिरंगी

कॉस्म-दी-गार्द नावाचा पोर्तुगीज प्रवासी कोकणातून गोव्याकडे निघाला होता. प्रवासात त्याला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची वार्ता मिळाली.

Chhatrapati Shivaji Maharaj's | Sakal

विश्रांतीसाठी थांबलेले गाव

हा गार्द एका छोट्याशा खेड्यात विश्रांतीसाठी थांबला. तिथे त्याच्याभोवती गावकऱ्यांची गर्दी जमली.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

वकऱ्यांचं कुतूहल

एक गोरा, वेगळ्या वेशातील फिरंगी पाहून खेडूतांना कुतूहल वाटले. कोण हा, काय म्हणतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

गार्दची महत्त्वाची माहिती

गार्द मोडक्या मराठी-कोकणी मिश्र भाषेत म्हणाला, "तुमचा शिवाजीराजा सिंहासनावर बसणार आहे हे माहीत आहे का?"

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

खेडुतांची पहिली प्रतिक्रिया

खेडूतांना ही बातमी प्रथमच समजली. त्यांना त्या मोडक्या भाषेतून कळले – आपला राजा आता राज्याभिषेकाच्या तयारीत आहे!

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

गावात आनंदाचे वातावरण

ते सर्वजण विलक्षण आनंदले. काही न बोलता, त्यांच्या डोळ्यांतून आणि चेहऱ्यावरून तो अभिमान स्पष्ट दिसत होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek | Sakal

स्वाभिमानाची जागृती

या छोट्या घटनेतूनही सामान्य मराठी माणसाचा शिवरायांबद्दलचा आत्मिक जिव्हाळा आणि स्वाभिमान दिसून आला.

Chhatrapati Shivaji maharaj | Sakal

शिवरायांनी दिलेला आत्मसन्मान

राज्याभिषेक हे केवळ एक राजकीय किंवा औपचारिक पाऊल नव्हते, तर रयतेच्या स्वाभिमानाला दिलेला नवा उजाळा होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | ESakal

हेच शिवरायांचे खरे यश

माध्यमांपासून दूर असलेल्या रयतेलाही जेव्हा शिवराज्याभिषेकाची वार्ता समजली, तेव्हा त्यांनी हृदयपूर्वक स्वीकारून राष्ट्रभक्ती दाखवली – हेच शिवरायांचे खरे यश.

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek | Sakal

बर्थ डे बॉय अजिंक्य रहाणेला 'Jinx' का म्हणतात माहित्येय?

Ajinkya Rahane Birthday
येथे क्लिक करा