Apurva Kulkarni
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आज तिचा 33 वा वाढदिवस आहे.
नोराने तिच्या आयुष्यात आर्थिक नाहीतर मानसिक सुद्धा स्ट्रगल करावा लागला.
नोराच्या डान्स करण्यावर तिच्या घरच्यांचा विरोध होता. त्यासाठी नोराने एकदा आईचा मार सुद्धा खाल्ला होता.
कॅनडातून भारतात नोरा फक्त 5 हजार घेऊन आली होती. 10 मुलींसोबत तिने रुम शेअर केली.
पैस नसल्याने काही दिवस तिने अंडा, ब्रेड आणि दूध पिऊन दिवस काढले. अशातच तिची 20 लाख रुपयांची फसवणूक सुद्धा झाली.
2014 मध्ये रोअर चित्रपटातून तिने डान्सला सुरुवात केली. मग तिने अनेक सुपरहिट सिनेमे केले.
नोरा 52 करोडची मालकीन आहे. आता नोरा एका इव्हेंटसाठी लाखो रुपये चार्ज घेते.