Apurva Kulkarni
मावरा होकेन ही 'सनम तेरी कसम' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहे. नुकताच तिने विवाह केला आहे.
चित्रपटातील सरुची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली मावरा होकेनने लग्न सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मावरा होकेननं पाकिस्तानी अभिनेत्याशी लग्न केलं आहे. अभिनेता अमीर गिलानीसोबत ती लग्नबंधनात अडकली आहे.
मावराने एकदम थाटामाटात अमीरसोबत लग्नगाठ बांधली आहे.
मावराने स्वत: लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
फोटो शेअर करत तिने 'आजबाजूच्या गोंधळामध्ये मी तुला अखेर मिळवलच' असं कॅप्शन लिहलं आहे.
मावराच्या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छा येत आहेत. अनेकांना अश्चर्याचा धक्का बसला आहे.
'सबात' आणि 'नीम' सारख्या मालिकांमध्ये मावरा आणि अमीरने एकत्र काम केलं होतं.
सनम तेरी कसमचा सीक्वल सुद्धा येत आहे. त्याचही काम सुरु आहे.