Anushka Tapshalkar
नथ हा आज भारतीय संस्कृतीचा आणि विशेषतः लग्नसोहळ्याचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र, इतिहासानुसार नाकात दागिना घालण्याची प्रथा भारतात तुलनेने उशिरा आली. साधारण आठव्या ते तेराव्या शतकादरम्यान ही प्रथा भारतात पोहोचल्याचे सांगितले जाते.
Nath Origin
sakal
ऐतिहासिक पुराव्यांनुसार मध्यपूर्वेतील काही प्रदेशांमध्ये हजारो वर्षांपूर्वीपासून नाकात दागिने घालण्याची प्रथा होती. पुढे विविध सांस्कृतिक संपर्कांमधून ही परंपरा भारतात आली आणि भारतीय संस्कृतीचा भाग बनली.
Middle East Roots
sakal
प्राचीन भारतीय शिल्पांमध्ये दागिन्यांचे बारकाईने चित्रण आहे; मात्र नाकातील दागिने दिसत नाहीत. तसेच, सुश्रुत संहितेत नाक टोचण्याचा नव्हे, तर कान टोचण्याच्या (कर्णवेध) विधीचा उल्लेख आढळतो.
Nath History
sakal
सोळाव्या शतकातील मुघल दरबारात नक्षीदार आणि आकर्षक दागिन्यांना विशेष महत्त्व होते. या काळात नथीचे स्वरूप अधिक मोठे आणि कलात्मक झाले. पुढे राजपूत, मराठे आणि इतर राजघराण्यांनीही या दागिन्यांचा स्वीकार केला.
Mughal Era
sakal
भारतीय परंपरेत नथीला विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मोठी गोलाकार नथ आणि कानाला जोडलेली साखळी हे नववधूच्या दागिन्यांचे खास वैशिष्ट्य आहे. तिचा संबंध देवी पार्वतीशीही जोडला जातो.
Saubhagya
sakal
नथीला देवी पार्वतीचे प्रतीक मानले जाते. ती सौभाग्य, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक असून मुलीच्या स्त्रीत्वाकडे होणाऱ्या प्रवासाशीही जोडली जाते.
sakal
डाव्या नाकपुडीमध्ये नथ घालण्यामागे आयुर्वेदिक मान्यता आहे. यामुळे मासिक पाळीचा त्रास कमी होतो आणि प्रसूती सुलभ होते, अशी धारणा आहे. मात्र, याला वैज्ञानिक पुरावा नाही.
Ayurveda on Why Pierce Left Nostril
sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Disclaimer
sakal
How is Saree Zari Made
sakal