साडीवरची जर नेमकी कशी बनते?जाणून घ्या ७ खास गोष्टी!

Anushka Tapshalkar

जर म्हणजे नेमकं काय?

साडीला सोनेरी किंवा चंदेरी चमक देणाऱ्या खास धाग्याला जर म्हणतात. ही केवळ सजावट नसून पारंपरिक विणकामातील एक खास कला आहे.

How is Saree Zari Made

|

sakal

जर कशी तयार केली जाते?

रेशीम किंवा इतर धाग्याभोवती धातूची अतिशय पातळ पट्टी गुंडाळून पारंपरिक जर तयार केली जाते. यामुळे धाग्याला चमकदार लूक मिळतो.

How is Saree Zari Made

|

sakal

जरीचा वापर कुठे होतो?

पैठणी, बनारसी अशा पारंपरिक साड्यांच्या काठावर, पदरावर आणि नक्षीकामात जरीचा वापर केला जातो. यामुळे साडीला राजेशाही लूक मिळतो.

How is Saree Zari Made

|

sakal

अस्सल जर (Real Zari)

पूर्वी जर तयार करण्यासाठी सोन्या-चांदीचा वापर केला जायचा. अस्सल झरीमध्ये चांदीच्या बारीक पट्टीवर सोन्याचा मुलामा दिला जातो.

How is Saree Zari Made

|

sakal

इमिटेशन जर (Imitation Zari)

तांब्यासारख्या धातूवर सोनेरी किंवा चंदेरी मुलामा देऊन ही जर तयार केली जाते. अस्सल जरीच्या तुलनेत ती अधिक किफायतशीर असते.

How is Saree Zari Made

|

sakal

आधुनिक मेटॅलिक जर (Metallic Zari)

धातूचा थर असलेल्या पॉलिस्टर फिल्मपासून ही जर तयार केली जाते. ती वजनाने हलकी आणि दिसायला चमकदार असते.

How is Saree Zari Made

|

sakal

जरीच्या साडीची काळजी कशी घ्याल?

  • साडी सुती किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा.

  • ओलावा टाळून कोरड्या, हवेशीर जागेत साठवा.

  • एकाच ठिकाणी घडी पडू नये म्हणून वेळोवेळी घडी बदला.

  • साडीवरील सूचनांनुसार आवश्यकतेनुसार ड्राय क्लीनिंग करा.

How is Saree Zari Made

|

sakal

100 वर्षांपासून या गावात फटाकेच फोडले जात नाहीत!

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

eSakal

आणखी वाचा