Aarti Badade
पोषणतज्ञ सांगतात योग्य जेवणाचे वेळापत्रक!
आजच्या धावपळीत नाश्ता उशिरा, दुपारचे जेवण वगळणे किंवा रात्री उशिरा जेवणे ही सामान्य समस्या आहे.
उशीरा जेवणे किंवा जेवण वगळणे पचन, ऊर्जा, मूड आणि मेंदूच्या कार्यावर नकारात्मक परिणाम करते.
आपले शरीर सर्कॅडियन लयवर चालते – हे पचन, भूक आणि चयापचय नियंत्रित करते.
वेळेवर खाल्ल्याने पचन सुधारते, मूड चांगला राहतो आणि शरीर ऊर्जावान राहते.
पोट फुगणे, थकवा, मूड स्विंग्स यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
दर २.५ ते ३ तासांनी काहीतरी निरोगी खाल्ल्याने चयापचय सक्रिय राहते.
सकाळी पौष्टिक नाश्ता → दुपारी वेळेवर जेवण → रात्री झोपण्यापूर्वी २-३ तास आधी हलके जेवण.
फळे, भाजलेले हरभरे, हलका घरगुती नाश्ता – यामुळे ऊर्जा टिकते आणि जंक फूड टाळता येते.
योग्य वेळेवर आणि योग्य अंतराने खाणे हेच चांगल्या आरोग्याचे गुपित आहे!