Anushka Tapshalkar
चुकीची उशी वापरल्याने मान, डोके आणि पाठीच्या कण्यावर ताण येऊ शकतो. यामुळे झोपेचा दर्जाही खराब होऊ शकतो.
Sleep
esakal
उशी खूप उंच, पातळ किंवा कडक असल्यास मानेवर अतिरिक्त दबाव येतो. सकाळी उठल्यावर मानदुखी किंवा मानेत कडकपणा जाणवू शकतो.
Neck Pain
Sakal
चुकीच्या उशीमुळे मान आणि खांद्याच्या स्नायूंवर ताण येतो. परिणामी खांदे जड वाटणे आणि सकाळी डोकेदुखी होऊ शकते.
Shoulder pain
Sakal
अस्वस्थ उशीमुळे झोपताना शरीराची योग्य ठेवण राहत नाही. त्यामुळे रात्री वारंवार झोप मोडणे आणि सकाळी थकवा जाणवणे शक्य आहे.
Disturbed Sleep
sakal
अतिशय पातळ उशी डोके आणि मानेला पुरेसा आधार देत नाही. त्यामुळे मानेचा आणि पाठीच्या कण्याचा नैसर्गिक समतोल बिघडू शकतो.
Thin Pillow
sakal
पाठीवर झोपणाऱ्यांसाठी मध्यम उंचीची आणि मऊ-घट्ट संतुलित उशी योग्य ठरू शकते. यामुळे मानेला नैसर्गिक आधार मिळतो.
कुशीवर झोपणाऱ्यांनी थोडी उंच आणि मजबूत उशी निवडावी. यामुळे मान आणि खांद्यामधील अंतर भरून पाठीचा कणा सरळ ठेवण्यास मदत होते.
Sleep
esakal
उशीची गुणवत्ता आणि स्थितीनुसार साधारण १ ते ३ वर्षांनी ती बदलण्याचा विचार करा. उशी सपाट झाली, आकार बदलला किंवा आधार कमी झाला असेल तर नवीन उशी घेण्याची वेळ आली आहे.