ना हीटर, ना गिझर! १०० वर्षांपूर्वी कडाक्याच्या थंडीत लोक कसे जगायचे?

Shubham Banubakode

१०० वर्षांपूर्वीची थंडी

१०० वर्षांपूर्वी आजच्यासारखे हीटर, गिझर किंवा थंडीपासून बचाव करणारे आधुनिक कपडे नव्हते. तरीही गावातील लोक पारंपरिक पद्धतींचा वापर करून थंडीचा सामना करायचे.

How People Survived Winter

|

esakal

थंडीपासून बचाव

घरांच्या भिंती मातीच्या आणि जाड असायच्या. छप्पर फूस किंवा खापरांचं असायचं. त्यामुळे घरातली उब टिकून राहायची. खिडक्याही लहान असल्याने थंड वारा घरात कमी शिरायचा.

How People Survived Winter

|

esakal

घरचा हीटर

संध्याकाळ झाली की लाकूड, पालापाचोळा आणि शेणाच्या गोवऱ्या जाळून शेकोटी पेटवली जायची. घरातील मंडळी आणि गावकरी शेकोटीभोवती बसून गप्पा मारायचे आणि थंडीपासून बचाव करायचे.

How People Survived Winter

|

esakal

रात्रीची झोप

रात्रीच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जुन्या कपड्यांपासून गोधड्या शिवल्या जायच्या. जमिनीवर पेंढा अंथरला जायचा. अनेक घरांमध्ये लहान मुलांसह संपूर्ण कुटुंब एकत्र झोपायचं.

How People Survived Winter

|

esakal

पारंपरिक कपडे

पुरुष धोतर, कुर्ता आणि बंडी घालायचे, तर महिला अंगावर शाल किंवा जाड चादर पांघरायच्या. काश्मीरमध्ये मात्र थंडीपासून बचाव करण्यासाठी फिरन आणि कांगडीचा वापर केला जायचा.

How People Survived Winter

|

esakal

खास पदार्थ

थंडीच्या दिवसांत शरीराला उब मिळावी म्हणून बाजरीची भाकरी, गूळ, तिळाचे लाडू, शेंगदाणे, सरसोंचा साग आणि गरम दूध असे पदार्थ खाल्ले जायचे. हे पदार्थ रोजच्या जेवणाचा भाग असायचे.

How People Survived Winter

|

esakal

रोजची कामं सुरूच

थंडी कितीही असली तरी रोजची कामं थांबत नव्हती. शेतकरी रात्रीच्या वेळीही पिकांना पाणी द्यायचे. महिला पाणी भरणे, स्वयंपाक आणि घरातील इतर कामं करायच्या.

How People Survived Winter

|

esakal

शेकोटीच आधार

एकंदरीत, शेकोटी, गरम जेवण, जाड गोधड्या आणि एकत्र झोपणं हेच त्या काळातील थंडीपासून बचाव करण्याचे प्रमुख उपाय होते.

How People Survived Winter

|

esakal

प्रशांत महासागराचा शोध कसा लागला?

Pacific Ocean discovery

|

esakal

हेही वाचा -