झाडं स्वत:चं अन्न कसं तयार करतात?

Pranali Kodre

झाडं अन्न कसं तयार करतात?

प्रत्येक सजीवाला अन्न आणि पाण्याची गरज असते, मग तुम्हाला माहित आहे का झाडं त्यांचं अन्न कसं तयार करतात?

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

Photosynthesis

तर झाडं प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

अन्न तयार करण्यासाठीचे घटक

झाडांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश, पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साइड आणि पानांमधील हरितद्रव्य (Chlorophyll) यांची गरज असते.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

Chlorophyll

झाडांच्या पानांमधील हरितद्रव्य (Chlorophyll) सूर्यप्रकाशाची ऊर्जा शोषतं.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

हवेतून कार्बन डायऑक्साइड

तसेच पानं हवेतून कार्बन डायऑक्साइड (CO₂) घेतात. यासाठी पानांवर लहान छिद्रे ('पर्णरंध्रे') असतात.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

मुळं शोषतात पाणी आणि खनिजे

मुळं जमिनीतून पाणी आणि खनिजे शोषतात आणि खोडामार्फत ती पानांपर्यंत पोहचवतात.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

झाडांचं अन्न

पानं हरितद्रव्यांच्या मदतीने सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड यांच्यात रासायनिक प्रक्रिया करून ग्लुकोज तयार करतात, जे झाडांचे अन्न असतं.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

ऑक्सिजन

या प्रक्रियेत जे ऑक्सिजन तयार होतं, ते झाडं वातावरणात सोडतात.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

सर्वच स्वत:चं अन्न करत नाही

दरम्यान, बरीच हिरवी झाडं अशाचप्रकारे अन्न तयार करत असले तरी, सर्वच झाडं असं अन्न तयार करत नाहीत.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

परजीवी झाडं

काही झाडं परजीवी असतात, जसे की अमरवेल, जे इतर वनस्पतींकडून पाणी किंवा पोषकद्रव्यं मिळवतात.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

कीटकांवर अवलंबून असलेली झाडं

काही वनस्पतींना अन्नासाठी किटकांवर अवलंबून लहावं लागतं. उदाहरणार्थ, Venus Flytrap आणि Pitcher Plant. ही झाडं प्रकाशसंश्लेषण करत असले, तरी नायट्रोजनसारखी काही पोषकद्रव्ये कीटकांपासून मिळवतात.

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

ऑफिस डेस्कसाठी पीस लिली का निवडावी?

Peace Lily for Office Desk

|

Sakal

येथे क्लिक करा