Aarti Badade
रम्मीचा इतिहास मेक्सिकोमधील एका जुन्या खेळाशी जोडलेला आहे. तो खेळ म्हणजे कॉनक्वियन!
कॉनक्वियन हा दोन खेळाडूंचा एक पत्त्यांचा खेळ होता. सुरुवातीला यात स्पॅनिश पत्त्यांचा वापर केला जात असे.
काही माहितीनुसार, कॉनक्वियन १७ व्या शतकात खेळला जात होता. त्याचे नियम आजच्या रम्मीसारखेच होते.
हा खेळ मेक्सिकोहून अमेरिकेत पोहोचला. तिथे त्यात बदल होऊन तो आणखी आधुनिक बनला.
१९०९ मध्ये न्यूयॉर्कच्या एलवूड बेकर यांनी 'जिन रम्मी' नावाचा एक नवीन प्रकार तयार केला.
'रम्मी' हा शब्द 'रम' या दारूशी संबंधित आहे. काही वेळा दारूचा खेळात 'स्टेक' (म्हणजे पैज) म्हणून वापर केला जात असे.
रम्मीचे नियम ठरलेले नाहीत, हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. हा खेळ अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये खेळला जातो.
रम्मी हा खेळ सुरुवातीला फक्त दोन खेळाडूंसाठी बनवला होता, पण आता तो अनेक लोक एकत्र खेळू शकतात.