Saisimran Ghashi
पहिले बाजीराव पेशवे हे एक कर्तबगार, धैर्यवान आणि बुद्धिमान शासक होते. ते एक उत्तम योद्धा होते आणि त्यांनी अनेक युद्ध जिंकली.
पण दुसऱ्या बाजीरावने अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक तह, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.
बाजीराव दुसरा (बाजीराव II) यांचा जन्म 10 जानेवारी 1775 रोजी झाला आणि 28 जानेवारी 1851 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
तो मराठा साम्राज्याचा 13 वा आणि शेवटचा पेशवा होता, ज्याने 1795 ते 1818 पर्यंत राज्य केले.
इतर पेशव्यांप्रमाणे त्याला लष्करी शिक्षण मिळाले नाही, त्याचे शिक्षण मुख्यतः भिक्षुकीचे होते.
बाजीरावाने इंग्रजांशी अनेकदा तह केले, ज्यामध्ये 1802 मध्ये वसईचा तह (Treaty of Bassein) विशेष महत्त्वाचा ठरला, ज्यामध्ये इंग्रजांना मराठा साम्राज्यात सैन्य ठेवण्याची आणि राजकीय कारभार करण्याचा अधिकार मिळाला
1818 मध्ये, बाजीराव दुसरा इंग्रजांकडून पराभूत झाल्यावर, मराठा साम्राज्याचा अधिकृतपणे अंत झाला.