सकाळ डिजिटल टीम
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सण मानला जातो.
शिवरात्री आणि महाशिवरात्रीमध्ये काय फरक आहे जाणून घ्या.
शिवरात्री आणि महाशिवरात्री हे भगवान शिव यांना समर्पित दोन प्रमुख सण म्हणून साजरे करतात.
'मासिक शिवरात्री' म्हणून ओळखली जाणारी शिवरात्री दर महिन्याला येते.
भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा वर्षभर केली जात अलसी तरी शिवभक्तांसाठी शिवरात्री उत्सवाचे विशेष महत्त्व आहे.
महाशिवरात्री ही एका कॅलेंडर वर्षात येणाऱ्या १२ शिवरात्रांपैकी एक सर्वात आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे.
हा धार्मिक कार्यक्रम फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला होतो.
भगवान शिवाच्या भक्तांसाठी या दिवसाचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे.
हा दिवस मोठ्या आनंदाने आणि भक्तीने साजरा केला जातो.