Payal Naik
मराठी मालिका विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
तेजश्री लवकरच झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तेजश्री व्यावसायिक आयुष्यात अत्यंत आनंदी असली तरी वैयक्तिक आयुष्यात तिने अनेक आघात सहन केलेत.
तिने अभिनेता शशांक केतकरसोबत लग्न केलं होतं मात्र त्यांचं लग्न काही वर्षातच मोडलं.
त्यानंतर काही वर्षांनी तेजश्रीने तिच्या आईला गमावलं. तिच्या आईचं निधन झालं.
तेजश्रीची आई सीमा प्रधान यांचं १६ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झालं. त्यांचं मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं.
आईच्या निधनानंतर तेजश्री पूर्ण तुटली होती. सीमा या आजारी होत्या. मात्र कुटुंबातील सदस्यांनी अद्याप या आजाराबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
तेजश्रीने आईच्या आठवणीत काही पोस्टही शेअर केल्या आहेत.
मालिकेत लग्न पण सुबोध- तेजश्रीमध्ये किती वर्षाचं अंतर आहे? आकडा वाचून भुवया उंचावतील