सकाळ डिजिटल टीम
जर तुम्ही तणावाखाली असाल आणि नैराश्यात गेला असाल, तर हे नैराश्य जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे असू शकते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकते. तसेच व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे देखील कमजोर होतात.
खरं तर, व्हिटॅमिन डी मेंदूमध्ये Serotonin वाढवते; पण त्याच्या कमतरतेमुळे Mood Swing होऊ शकते.
कमी सेरोटोनिनमुळे चिंता निर्माण होऊ शकते. हे नैराश्याच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मानसिक कमजोरी येऊ शकते. त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
ही कमतरता दूर करण्यासाठी, तुम्ही सौम्य सूर्यप्रकाशात बसले पाहिजे. तुमच्या आहारात मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
'साडी नेसल्यामुळे महिलांना होऊ शकतो कॅन्सर'; डॉक्टर म्हणतात, त्या जखमा खूप धोकादायक..